मनविसे व मयुरेश,अनिकेत,शिवशक्ती मोबाईल शाॅपी यांच्या कडून शैक्षणिक सामान चे वाटप बारा विद्यार्थ्यांना करण्यात आले.. सागर बडवे
प्रतिनिधी पंढरपूर.
मनविसे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.आदित्य साहेब शिरोडकर यांच्या आदेशाने, मनसे सरचिटणीस मा.दिलीप बापु धोत्रे, मनविसे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अॅड.सचिन पवार साहेब व मनविसे सोलापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष मा.विजय रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व मयुरेश मोबाईल शाॅपी, अनिकेत मोबाईल शाॅपी, शिवशक्ती मोबाईल शाॅपी यांच्या कडून इयत्ता बारावी विज्ञान विभाग,वाणिज्य विभाग व कला विभाग या विद्यार्थीनी ला वार्षिक शैक्षणिक सामान म्हणजेच पुस्तके,वह्या,कंपास,सॅक व पेन हे देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व मयुरेश मोबाईल शाॅपी, अनिकेत मोबाईल शाॅपी, शिवशक्ती मोबाईल शाॅपी यांनी सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत केली.यावेळी के.पी.बी.काॅलेज चे प्राचार्य डॉ.पुंडलिक शिंदे सर,अनंत जाधव सर, सागर बडवे महाराष्ट्र सैनिक, शैलेश धट शहर संघटक, प्रताप भोसले शहराध्यक्ष, पुजा माळी शहराध्यक्ष, अवधुत गडकरी शहर उपाध्यक्ष, रोहन पंढरपुरकर शहर उपाध्यक्ष, दिनेश जगताप, प्रथमेश धमाळ व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…
