अकलूजसह,माळशिरस तालुक्यातील जनतेने भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाहन

अकलूजसह,माळशिरस तालुक्यातील जनतेने भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आवाहन

प्रतिनिधी—सोलापूर—दिल्लीमध्ये कृषी कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 8 तारखेला भारत बंदची हाक दिली आहे,त्या बंद मध्ये अकलूजसह माळशिरस तालुक्यातील व्यापारी,शेतकरी, सर्वसामान्य जनता,व दुकानदार यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे तसेच या बंद मध्ये कुणावरही बळजबरीने केली जाणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारने चर्चेविना नवा कृषी कायदा आमलात आणत शेतकऱ्यांना जाचक असणाऱ्या तरतुदी लादल्या आहेत शेतकरी संघटनांशी याबाबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्या अपयशी ठरल्या.त्यामुळे या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी भारत बंद पुकारला आहे,या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ही समर्थन देण्यात आले आहे.तसेच महविकास आघाडी सरकारमध्ये सामिल असलेल्या घटक पक्षांनीही पाठींबा दिला असल्याने अकलूज सह माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने,शेतकरी,व्यापारी यांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन बंद यशस्वी करावा या बंद मध्ये कुणालाही बळजबरी केली जाणार नसून ज्यांना या बंद मध्ये मनाने सहभागी व्हावे असे वाटत असेल त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom