बहुजन ब्रिगेडच्या नातेपुते शहाराध्यक्षपदी लखन ओव्हाळ
नातेपुते–प्रतिनिधी—
बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत व बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या सूचनेनुसार लखन ओव्हाळ यांची बहुजन ब्रिगेड संघटनेच्या नातेपुते शहाराध्यक्षपदी अकलूजमध्ये निवड करण्यात आली.सदर निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बहुजन ब्रिगेडचे शंकर वाघमारे,पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अमित सोरटे,जिल्हा सचिव माऊली धाइंजे,जिल्हा उपाध्यक्षप नारायण पावर,जिल्हा उपाध्यक्षपदी दत्ता सावंत,बहुजन ब्रिगेडच्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,नातेपुते विभाग प्रमुख सतिश बजबळकर,पिंटू एकतपुरे,सागर कोळी,इत्यादी उपस्थित होते.
