८ डिसेंबरच्या भारत बंदला बहुजन ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा–दत्ता कर्चे
प्रतिनिधी—पुणे—दिल्लीमध्ये कृषी कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन चालू असून त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ तारखेला भारत बंदची हाक दिली आहे,त्या बंदमध्ये महाराष्ट्र राज्यातील व्यापारी,शेतकरी,सर्वसामान्य जनता,व दुकानदार यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा बंद पाळावा असे बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने चर्चेविना नवा कृषी कायदा आमलात आणत शेतकऱ्यांना जाचक असणाऱ्या तरतुदी लादल्या आहेत शेतकरी संघटनांशी याबाबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्या अपयशी ठरल्या.त्यामुळे या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी भारत बंद पुकारला आहे,या भारत बंदला बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने समर्थन दिले असल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेने,शेतकरी,व्यापारी यांनी उस्फुर्तपणे सहभागी होऊन बंद यशस्वी होण्यासाठी सहभागी होण्याचे व पाठिंबा देत असल्याचे बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी जाहीर केले आहे.

