सवतगव्हाण,माळीनगर,संग्रामनगर(रत्नपुरी)गट नंबर दोन या रेशन दुकानाची चौकशी करण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

सवतगव्हाण,माळीनगर,संग्रामनगर(रत्नपुरी)गट नंबर दोन या रेशन दुकानाची चौकशी करण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

प्रतिनिधी—सोलापूर—माळशिरस तालुक्यातील सवत गव्हाण,माळीनगर,संग्रामनगर,गट नंबर दोन या रेशन दुकानाची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी श्री अनिल कारंडे यांना निवेदन दिले आहे.

सवतगव्हान-चालक निंबाळकर, माळीनगर-एस एस मुळे,संग्रामनगर-भिताडे,गट नंबर 2 -मुंडफने,बारभाई गट-निंबाळकर ह्या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून लॉक डाउनच्या कालावधीत सरकारकडून रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य देण्याची योजना राबविण्यात आली त्या योजनेमध्ये वरील दुकानात मोठया प्रमाणावर काळा बाजार झाल्याची शक्यता निर्माण झाली आहे,त्यामुळे वरील सर्व दुकानात असलेल्या एकूण रेशनकार्ड धारकांना किती माल वाटप करण्यात आला?त्या सर्व कार्डधारकांना युनिट प्रमाणे माल वाटप करण्यात आला का?तसेच वरील रेशन दुकानात असलेल्या सर्व रेशनकार्ड धारक यांना खरोखरच माल देण्यात आला का?त्या सर्व रेशनकार्ड धारक यांचा थम्ब प्रत्येक वेळी घेण्यात आला का? त्याचप्रमाणे वरील सर्व दुकानदारांच्या थम्ब मशीन तापसाव्यात,तसेच आधारकार्ड घेऊन वरील सर्व दुकानात किती लाभ धारकांना लाभ देण्यात आला?तसेच सरकारच्या माध्यमातून ज्याला केशरी कार्ड आहे पण माल मिळत नव्हता त्यांना सरकाने रेशन दुकानात माल उपलब्ध करून दिला होता, त्या एकूण किती केशरी रेशनकार्ड धारकांना या सर्व रेशन दुकानातून माल वाटप करण्यात आला?वरील सर्व दुकानाची दप्तर तपासणी करण्यात यावी,तसेच या सर्व मागण्याची चौकशी करण्यासाठी आपण तात्काळ एक चौकशी कमिटी नेमन्याची मागणी बहुजन ब्रिगेड संघटनेने केली आहे.

सदर चौकशी ही ज्या दिवशी रेशन वाटप आहे त्याच दिवशी करण्यात यावी तसेच शासनाच्या नियमानुसार दुकान चालू न ठेवणाऱ्या दुकान चालकांवर कारवाई करावी आणि वरील मागण्याच्या चौकशी मध्ये दोषी आढळणाऱ्या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदाराने काळा बाजार केल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात अशी मागणी केली असून या प्रकरणी तात्काळ दखल न घेतल्यास पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक 9 अक्टोबर 2020 पासून शासकीय वेळेमध्ये जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या जमावबंदी आदेशाचे पालन करून बोंबाबोंब व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom