बहुजन ब्रिगेडच्या आंदोलनाला मिळाले यश अकलूजसह माळशिरस तालुक्यातील पूरग्रस्तांना मिळाली मदत

बहुजन ब्रिगेडच्या आंदोलनाला मिळाले यश
अकलूजसह माळशिरस तालुक्यातील पूरग्रस्तांना मिळाली मदत

प्रतिनिधी–माळशिरस–माळशिरस तालुक्यामध्ये सप्टेंबर व अक्टोबर महिन्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने अनेक जनतेच्या घराचे नुकसान झाले होते,अनेकांची घरे वाहून गेली होती त्यांना तात्काळ मदत करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड चे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांनी उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.त्याची दखल घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात व अक्टोबर महिन्यात पूर आल्याने सर्वसामान्य जनतेच्या घरात पाणी शिरल्याने व घराची पडझड झालेल्या पूरग्रस्तांना खालीलप्रमाणे शासनाकडून मदत देण्यात आली आहे.

सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीमुळे ५८० घरात पाणी गेले होते यात  संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेल्या लाभार्थ्यांना लाभ देताना पहील्या टप्पेत प्रत्येकी २३०० रुपये देण्यात आले. तर दुसऱ्या टप्पेतील उर्वरीत २७०० रूपये २७ ऑक्टोबर २०२० रोजी अनुदान देण्यात आले . त्यामुळे ५८० लाभार्थला प्रत्येकी ५ हजार रक्कम जमा झाली.  तर  सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतीवृष्टीतील ५ लाभार्थांना प्रत्येकी ५ हजार थेट जमा करण्यात आले यात एकुण १५ लाख ९१ हजार वितरीत करण्यात आले. तर  आक्टोबर मध्ये उद्धवलेल्या पुर व अतिवृष्टीमुळे घरात पाणी गेलेल्या व  संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेल्या २ हजार ६५४ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे १ कोटी ३२ लाख २७ हजार २७ ऑक्टोबर रोजी थेट लाभार्थाच्या खात्यावर वर्ग झाले . सप्टेंबर मध्ये २८० घरांची पडझड झाली होती त्यांना प्रत्येकी ६ हजार प्रमाणे अनुदान वितरीत करणेत आलेले आहे असे माळशिरस तहसील कार्यालयामार्फत सांगण्यात आल्याने बहुजन ब्रिगेडच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom