कार्यक्रम अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात दाखल
प्रतिनिधी—सोलापूर—माळशिरस तालुक्यातील माळशिरस पोलीस स्टेशनमध्ये श्री जावेद शेख कार्यक्रम अधिकारी(म.बा. वि.)जिल्हा परिषद सोलापूर यांच्यावर अनुसूचित जातीआणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात झाला असल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली १२ अक्टोबररोजी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.तसेच गुन्हा दाखल झालेला असल्याने त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये तशी नोंद करण्यात यावी,तसेच त्यांचे प्रमोशन होणार असेल तर ते या गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत स्थगित करण्यात यावे,त्याचप्रमाणे या गुन्ह्याचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत त्यांना कामावर रुजू करून घेऊ नये.तसेच संबंधित अधिकारी यांना निलंबित करण्याचा अधिकार आपल्याला नसल्यास त्याचा प्रस्ताव आपण त्यांच्या संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे त्वरित पाठवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री प्रकाश वायचळ यांच्याकडे केली होती.तसेच या मागणीची दखल घेऊन त्वरित कार्यवाही न केल्यास २७ अक्टोबरला पुणे येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला होता.
त्याची दखल घेऊन मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जावेद शेख जिल्हा कार्यक्रम अधिकारी(म.बा.वि)जिल्हा परिषद सोलापूर यांच्या बाबतीत शिस्तभंगाविषयक प्राधिकारी मा. सचिव महिला व बालकल्याण विभाग मंत्रालय मुंबई हे असल्याने त्यांना आपले तक्रारी बाबत कळविण्यात आलेले असून आपल्या निवेदनाची दखल घेतली असून नियमानुसार पुढील कार्यवाही करणेत येत असल्याचे लेखी पत्र उपमुख्यकार्यकारी अधिकारी (प्रशा) जिल्हा परिषद सोलापूर यांनी देऊन माझे २७ अक्टोबरला पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर होणारे आंदोलन करू नये अशी विनंती केली असल्याने माझ्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले.
