माळशिरस तालुक्यातील खाजगी लॅब टेक्निशन यांच्यावर कारवाई करा–राष्ट्रवादी काँग्रेस

माळशिरस तालुक्यातील खाजगी लॅब टेक्निशन यांच्यावर कारवाई करा–राष्ट्रवादी काँग्रेस

प्रतिनिधी—अकलूज—माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून डेंग्यूच्या चाचणीच्या तपासणीसाठी अमाप पैसे घेणाऱ्या खाजगी लॅब टेक्निशन यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन दिले आहे,

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूका अध्यक्ष माणिक वाघमोडे,युवक चे जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,युवकचे तालुका अध्यक्ष बाबा जाधव,ओबीसी तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे,पिंटू एकतपुरे,सोमनाथ शेळके,बंडू कांबळे,उदय कांबळे,जावेद शेख,अमोल कुचेकर,धवल कांबळे,आकाश जाधव,रवी कांबळे,जाकीर सय्यद,अमोल काळे,हनंमत वायदंडे राहूल सराटे संजय पनासे गणेश साठे.इत्यादी उपस्थित होते

तसेच निवेदनामध्ये म्हटले आहे, की माळशिरस तालुक्यामध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले आहे,आणि सर्वसामान्य माणसाला हा आजार झाल्यानंतर त्यांना खाजगी दवाखान्यात उपचार घेणे परवडणारे नाही,या आजाराची चाचणी करताना खाजगी रक्त चेक करणारे लॅब टेक्निशन अमाप अशी फी व पैसे वसूल करीत असल्याचे दिसून आले आहे,तसेच या चाचणीसाठी रुग्णाकडून फक्त ६०० रुपये घ्यावेत असा शासनाचा आदेश असताना हे लॅब टेक्निशन आदेशानुसार पैसे न घेता जास्त पैसे घेऊन रुग्णांची लूट करीत आहेत तरी आपण या तालुक्यामध्ये सर्वमान्य जनतेची डेंग्यूच्या चाचणी करण्याच्या तपासणी साठी अमाप पैसे वसूल करणाऱ्या लॅब टेक्निशन यांच्यवरती त्वरित कारवाई करावी.अन्यथा आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.

चौकट—
उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांना लेखी पत्र काढून माळशिरस तालुक्यातील खाजगी लॅब टेक्निशन सर्वसामान्य जनतेकडून डेंग्यूच्या चाचणीसाठी अमाप फी घेतात का?याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,तसेच सर्वसामान्य जनतेची खाजगी लॅब टेक्निशन यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होऊ नये तसेच या डेंग्यूच्या आजारावर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केला जातो याची जनजागृती करण्यात यावी.

शमा पवार
उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom