भूमिअभिलेख मुख्यालय सहाय्यक ऊर्मिला पवार यांची आमदार सातपुते यांनी माफी मागावी—किरण साठे

भूमिअभिलेख मुख्यालय सहाय्यक ऊर्मिला पवार यांची आमदार सातपुते यांनी माफी मागावी—किरण साठे

प्रतिनिधी—माळशिरस—-माळशिरस चेआमदार राम सातपुते यांनी भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी भेट दिल्यानंतर चा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचे पाहिल्यानंतर मी त्यांचे अभिनंदन केले होते.
झाला प्रकार समजून घेण्यासाठी माळशिरस भूमिअभिलेख या कार्यालयामध्ये जाऊन मुख्यालय सहाय्यक उर्मिला पवार यांची भेट घेतली,व सविस्तर चर्चा केली,मात्र त्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत मला मिळालेली माहिती ऐकूण मी अचंबित झालो,व या कार्यालयामधील कर्मचारी यांनी किर्दक यांचे तीन हजार रुपये घेतल्याचा आमदार यांनी केलेला आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे,मी अधिकारी यांना विचारले ते कसे काय? तर त्या म्हणाल्या की आमदार ते सिध्द करू शकले नाहीत. माळशिरस तालुक्याचा जबाबदार लोकप्रतिनिधी आशा अपुऱ्या माहितीच्या आधारे कसा काय कोणत्याही कार्यालयामध्ये जाऊ शकतो हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे,आणि एखाद्या अधिकाऱ्यावर पैसे घेतल्याचा आरोप पुराव्या अभावी कसा करू शकतो असाही प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला आहे.तसेच त्या कार्यालयामध्ये किती पदे रिक्त आहेत,त्या कार्यालयाच्या कर्मचारी यांच्यावर कोणत्या विभागाचे जास्त पदभार आहेत याचीही चौकशी करायला पाहिजे होती,मात्र त्यांनी अशी कोणतीही चौकशी न करता तेथील अधिकारी यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला,त्यामुळे आमदार राम सातपुते यांनी त्या महिला अधिकारी उर्मिला पवार मॅडम यांची माफी मागावी अशी मागणी करून मी आशा अतिउत्साही नूतन आमदार राम सातपुते यांचा जाहीर निषेध करीत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom