धैर्यशील मोहिते पाटील यांनी मराठा समाजाचा पुळका असल्याचा आव आणू नये–धनाजी जाधव-पाटील
प्रतिनिधी—माळशिरस—मराठ्यांची जेवढी प्रगती होईल तेवढी प्रगती महाराष्ट्राची होईल असे मत धैर्यशील मोहिते पाटील यांनी काही वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या बतमीमध्ये व्यक्त केलेली भूमिका माझ्या निदर्शनास आली आहे.मराठा समाजाचा कधी नव्हे एवढा पुळका धैर्यशील मोहिते पाटील यांना आताच का आला आहे?असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला असल्याचे मत बहुजन ब्रिगेड संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी जाधव पाटील यांनी व्यक्त केले आहे.खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवली पाहिजे,सारथी सारख्या संस्थेला स्वायत्तता मिळायला हवी आहे,मराठा समाजामध्ये आर्थिक मागासलेल्या जनतेची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी माझीही आग्रही मागणी आहे.
मराठा समाजाची प्रगती व्हावी असे धैर्यशील मोहिते पाटील यांना वाटत असेल तर त्यांनी पूर्वी त्यांच्याकडे असलेल्या विजय शुगर कारखाण्याच्या ऊस उत्पादक शेतकरी यांची देणी का दिली नाहीत? त्या शेतकऱ्यामध्ये अनेक मराठा समाजाचे ऊस उत्पादक शेतकरी आहेत,तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या शिक्षण संस्थेमध्ये किती मराठा मुले व मुली यांना मोफत शिक्षण देऊन समाजाची प्रगती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत याचेही स्पष्टीकरण धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले पाहिजे आणि मग मराठा समाजाच्या प्रगतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत अशी टीका धनाजी जाधव पाटील यांनी केली आहे.
आता भाजप पक्षामध्ये असल्याने मराठा समाजाच्या आरक्षण मुद्याचे भांडवल करून उगाच आपली भूमिका मांडून सरकारला टीकेचे धनी करण्याचा प्रयत्न करायचा हा केविलवाणा प्रयत्न धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंद केला पाहिजे,मराठा आरक्षणाचा लढा हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडला आहे,राज्य सरकार न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत असून त्यांना शक्य आहे तेवढे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असून वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
आपण अगोदर मराठा समाजाच्या ऊस उत्पादक शेतकरी यांचे पैसे द्या आणि नंतर मराठा समाजाच्या प्रगतीच्या गोष्टी कराव्या अशी जहरी टीका धनाजी जाधव पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केली आहे.
