माळशिरस पंचायत समितीच्या चौकशीचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश–किरण साठेे
प्रतिनिधी—सोलापूर
माळशिरस तालुक्यातील विकास आराखड्यात येणाऱ्या अकलूज सह आठ गावाच्या सण जानेवारी 2019 ते 5 अक्टोबर 2020 या कालावधीतील पंचायत समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या बांधकाम परवण्याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर 12 अक्टोबरला बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला होता,त्या आंदोलनाची दखल घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.चौकशी अधिकारी म्हणून श्री एम.एस. बेळळे सहाय्यक गटविकास अधिकारी(नरेगा) ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांची नेमणूक केली आहे.
मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जी कागदपत्रे संबंधित परवानाधारकांनी सादर केली आहेत ती नियमात आहेत काय?बांधकाम परवानाधारक यांनी किती शुल्क पंचायत समितीच्या लिपिक अथवा अधिकारी यांना अदा केलेली रक्कम निर्धारण करण्याचा शासन निर्णय आहे काय?त्याचे पालन झाले काय?लिपिकास/अधिकारी यांना रक्कम स्वीकारण्यास आदेश आहेत काय?बांधकाम परवाना देताना नस्ती कोणकोणत्या अधिकारी/कर्मचारी यांच्या स्वाक्षरीने कार्यालय प्रमुखाकडे सादर केली.बांधकाम परवाना धारकाने शासन नियमानुसार शुल्क अदा केले का?केले असल्यास कार्यालयीन कर्मचारी यांनी बांधकाम परवानासाठी किती शुल्क स्वीकारले?स्वीकारले ले शुल्क कोणत्या लेखाशीर्षाखाली अथवा गटविकास अधिकारी यांच्या कोणत्या खात्यात रक्कम स्वीकारल्यापासून किती दिवसात जमा केली?रक्कम स्वीकारत असताना बँकेत भरणा केल्यानंतर लेखा विभागातील वरिष्ठ सहायक,सहा लेखाधिकारी यांनी नियंत्रण केले काय?जमा रक्कम कॅशबुकला नोंद घेतली काय?रक्कम स्वीकारल्याचे किंवा जमा केल्याची नोंद वही अद्यावत आहे काय?रक्कम स्वीकारताना रक्कम जमा केलेली पावती दिली गेली आहे काय?बांधकाम परवाना देताना उपरोक्त बाबी या कार्यालयातील संबंधित कनिष्ठ किंवा वरिष्ठ सहायक,कनिष्ठ प्रशासन अधिकारी,वरिष्ठ प्रशासन अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी प्राप्त कागदपत्रांची प्राप्त शुल्क शासन निर्णयानुसार असल्याची व ते बँकेत जमा केल्याची पडताळणी केली आहे काय?उपोरक्त बाबीच्या अनुषंगाने माहे जानेवारी 2019 ते 5 अक्टोबर 2020 या कालावधीतील नस्तीची कागदपत्रांची पडताळणी करून यामध्ये काही अनियमितता आढळल्यास जबाबदार कर्मचारी किंवा अधिकारी यांची नावे नमूद करून वस्तुनिष्ठ व स्वयंस्पष्ट अहवाल दहा दिवसांत देण्याचा आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी श्री प्रकाश वायचळ यांनी श्री एम.एस.बेळळे सहाय्यक गटविकास अधिकारी (नरेगा)ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांना दिला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला यश मिळाले असल्याचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.
