हुकूमशाही भाजप सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध
सोलापूर—राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देशाचे राष्ट्रपती यांना सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेश सरकारच्या निषेध करण्यात येत असल्याचे निवेदन पाठवले आहे.
उत्तर प्रदेश राज्यामध्ये हाथरस,बलरामपूर,आजमगढ, बुलदंशहर या ठिकाणी मुलींवर बलात्कार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे,तसेच भदोही मध्ये ही १४ वर्षाच्या मुलीला दगडाने ठेचून डोक्याच्या चिंध्या केल्या असून त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची शक्यता असून भाजपचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये महिला व मुली सुरक्षित नसल्याचे या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तसेच उत्तर प्रदेश राज्यामध्ये भाजपचे सरकार अस्तित्वात असून त्या ठिकाणी रामराज्य आणण्याचे स्वप्न पाहणारे भाजपचे सरकार यांच्या सरकारच्या काळात गुंडाराज चालू असून भर दिवसा मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली जात आहे,या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींना मृत्यू दंडाची शिक्षा करण्यात यावी,तसेच हाथरस या ठिकाणी पीडित कुटुंबातील सदस्य यांना भेटण्यासाठी जात असलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांना भाजप सरकाच्या आदेशानुसार हुकूमशाही पद्धतीने धकाबुक्की केल्याची घटनाही निंदनीय आहे,सदर घटनेचीही चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच या बलात्कार झालेल्या व काँग्रेस चे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की केलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस यांनी निवेदनात नमूद केले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख उपस्थित होते.
