किरण साठे हे लढवय्या नेतृत्व आहे–मनसे पंढरपूर विभाग प्रमुख अमोल घोडके
प्रतिनिधी—बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व मनसेचे माजी जिल्हाउपाध्यक्ष किरण साठे हे लढवय्या नेतृत्व असल्याचे मत मनसे पंढरपूर विभाग प्रमुख भारतीय चर्मकार महासंघाचे पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके यांनी व्यक्त केले.
किरण साठे यांनी मनसेमधून राजकारणाची सुरुवात केली,त्यांच्या कामाची पद्धत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे,त्यांनी केलेली आंदोलने,मोर्चे हे सर्वसामान्य जनतेला भावलेली आहेत.त्यांची आंदोलन सम्राट म्हणून सोलापूर जिल्ह्यात ओळख असून त्यांनी जिल्ह्यातील युवकांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करून राजकारणामध्ये दिशा देण्याचे कार्य केले आहे,त्यांनी केलेला संघर्ष मी स्वतः अनुभवला असून आम्ही मनसेमध्ये असताना एकत्र काम केले आहे,असेही अमोल घोडके यांनी सांगितले.
आतासुद्धा ते बहुजन ब्रिगेड नावाची स्वतःची एक सामाजिक संघटना चालवत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत,त्याचा लढवय्या बाणा त्यांनी अजून कायमच ठेवला असून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात त्यांच्या नावाची वेगळीच ओळख निर्माण केली असल्याने किरण साठे हे लढवय्या नेतृत्व असल्याचे मनसे पंढरपूर विभाग प्रमुख व भारतीय चर्मकार महासंघाचे पंढरपूर शहर अध्यक्ष अमोल घोडके यांनी आपले मत व्यक्त केले.
