सयाजीराजे पार्क येथील बेकायदेशीर वाळू उपसा केल्याप्रकरणी तहसीलदार यांचे चौकशीचे आदेश

सयाजीराजे पार्क येथील बेकायदेशीर वाळू उपसा केल्याप्रकरणी तहसीलदार यांचे चौकशीचे आदेश

प्रतिनिधी–माळशिरस–माळशिरस तालुक्यातील आनंद नगर येथील सयाजीराजे पार्क मधील व त्याच्या शेजारील बाजूला वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी RPI गवई गटाच्या वतीने जिल्हा कार्यध्यक्ष शंकर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष,रमेश धाइंजे,जिल्हा अध्यक्ष अमित सोरटे,जिल्हा संघटक नारायण पवार,माळशिरस तालुका अध्यक्ष वैभव धाइंजे,संपर्क प्रमुख दत्ता सावंत,महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,मनिषा सोनटक्के,अजय धाइंजे,रोहित नलवडे,विकास कांबळे,मामा मोहिते,अनिकेत नलवडे,चांगदेव होनमाणे,अभिजित रणदिवे,प्रसाद सोनटक्के,राजू कोळेकर इत्यादी उपस्थित होते. या आदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,बहुजन ब्रिगेडचे तालुका सरचिटणीस अभय भोसले यांनी पाठिंबा दिला.

माळशिरस तालुक्यातील आनंदनगर येथील असलेल्या सायजीराजे राजे पार्क मधील तळ्यातील बोटीने वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती त्वरित कारवाई करून त्या तळ्याच्या खोलीकरण करण्यासाठी बाहेर काढलेली वाळू वाळू माफिया सायजीराजे पार्क मधून खरेदी करून बाहेर विकताना दिसत असून माळशिरस तालुक्यातील एकही गावामध्ये वाळूचा ठेका नसताना सायजीराजे पार्कमधील तळ्यातील वाळू उपसा करण्याची परवानगी सायजीराजे पार्क च्या मालकाला कुणी दिली?असा प्रश्न उपस्थित झाला आहे,तसेच सायजीराजे पार्क शेजारीही वाळू उपसा चालू असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वाळू उपसा केला जातोय त्याच्यावर कारवाई करून सायजीराजे राजे पार्कच्या मालकलाही आजपर्यंत बेकायदेशीर वाळू उपसा केल्याप्रकरणी दंड आकारून कारवाई करावी तसेच ही बेकायदेशीर वाळू वाहतूक केलेली निष्पन्न करण्यासाठी गेल्या दोन महिन्यातील आनंदनगर ते अकलूज व आनंदनगर ते चाकोरे या रस्त्यावरील ज्यांच्या घरी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यांचे फुटेज तपासल्यानंतर ह्या बेकायदेशीर वाळू वाहतूक केलेल्या वाहनांची पोलखोल होणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.

सदर आंदोलनाला अनुसरून माळशिरस तालुक्याचे तहसीलदार श्री अभिजित पाटील यांनी अकलूज मंडळ अधिकारी व अकलूज पोलीस निरीक्षक यांना निवेदनात नमूद केलेल्या मुद्याच्या अनुषंगाने शहानिशा करून कार्यवाही करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom