म.न.से व लो.क.ग्रा.संस्था मायक्रोफाईनान्स व बचतगट हप्ता भरण्यासाठी मुदत वाढ मिळण्यासाठी पाठपुरावा करणार—सागर बडवे
प्रतिनिधी–महाराष्ट्र राज्यामध्ये लॉकडाउन झाल्याने बचतगट व मायक्रोफाईनान्स मध्ये कर्ज घेतलेल्या कर्जदारांना हप्ते भरणे शक्य नसल्याने त्यांना हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व लोककल्याणकारी ग्राहक संरक्षण संस्था योग्य पद्धतीने पाठपुरावा करणार असल्याचे मनविसे माजी जिल्हा संघटक व महाराष्ट्र सैनिक,लोककल्याणकारी ग्राहक संरक्षण संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर बडवे यांनी सांगितले.
पुढे बोलताना सागर बडवे म्हणाले की पंढरपूर शहर व तालुक्यातील बचतगट व मायक्रोफाईनान्स च्या कर्जधारक महिलांशी संपर्क साधला असता त्या महिलांनी आम्हाला कर्ज माफी नको कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदत वाढ हवी आहे असते त्यांचे मत व्यक्त केले तसेच ह्या कर्जधारक महिलांचे कर्ज माफ होणार नाहीच मात्र अशी मागणी करुण या कर्जधारक महिलांना पुढे मिळणाऱ्या कर्जापासून वंचित राहावे लागणार असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर भविष्यात नुकसान होणार असल्याने त्यांना हप्ते भरण्यासाठी मुदत वाढ मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सागर बडवे यांनी सांगितले.
