जांबूड येथील प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटशिक्षणाधिकारी माळशिरस यांच्या कार्यालयासमोर २३ सप्टेंबर ला बोंबाबोंब आंदोलन
प्रतिनिधी—श्रीपूर—जांबूड येथील माळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात चालू असलेल्या बांधकामाची चौकशी करून संबंधित बांधकाम धारकाने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात अतिक्रमण केले असेल व शाळेच्या मुख्याध्यापकानी त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित मुख्याध्यापक यांना निलंबित करावे व बांधकाम धारकावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी गटशिक्षणाधिकारी माळशिरस यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जांबूड (माळेवाडी)येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात चालू असलेले बांधकाम हे अधिकृत आहे?की अनधिकृत आहे,याची चौकशी करून संबंधित बांधकाम धारक यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतीच्या आतमध्ये व शाळेच्या मालकीच्या जागेमध्ये अतिक्रमण केले असल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात यावा,तसेच सदर चालू असलेले बांधकाम हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे याचीही चौकशी करण्यात यावी,हे बांधकाम जिल्हा परिषदेच्या शाळेची संरक्षण भिंत तोडून व शाळेच्या कंपाउंड च्या आत करण्यात येत आहे.
संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास हे बांधकाम आले नाही का?तसेच त्यांनी आपल्याकडे तशी तक्रार का केली नाही,याचीही चौकशी करून संबंधित मुख्याध्यापक यांना या बांधकाम धारकाला पाठिशी घातल्याने त्यांच्यावर निलंबित करण्याची कारवाई करावी तसेच या शाळेच्या आवारात असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आमदार फंडातून बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेच्या इमारतीमध्ये संबंधित बांधकाम धारक कोणाच्या परवानगीने राहत आहेत याचीही चौकशी करण्यात यावी अन्यथा गटशिक्षणाधिकारी माळशिरस पंचायत समितीच्या समोर दिनांक २१/९/२०२० रोजी तीव्र स्वरूपात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
