मोहिते पाटील यांच्या सायजीराजे पार्क येथील बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात RPI गवई गटाचे थाळीनाद आंदोलन

मोहिते पाटील यांच्या सायजीराजे पार्क येथील बेकायदेशीर वाळू उपसा विरोधात RPI गवई गटाचे थाळीनाद आंदोलन

प्रतिनिधी—माळशिरस —तालुक्याचे तहसीलदार श्री अभिजित पाटील यांना RPI गवई गटाच्या वतीने माळशिरस तालुक्यातील आनंद नगर येथील सायजीराजे पार्क मधील व त्याच्या शेजारील बाजूला वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफिया यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सोलापूर जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे यांनी निवेदन देऊन थाळीनाद आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश धाइंजे,युवक जिल्हा अध्यक्ष अमित सोरटे,जिल्हासंघटक नारायण पावर,युवक तालुकाध्यक्ष वैभव धाइंजे,महिला आघाडी तालुकाध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,अजय धाइंजे,दादा सावंत,दत्ता सावंत इत्यादी उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील आनंदनगर येथील असलेल्या सायजीराजे राजे पार्क मधील तळ्यातील बोटीने वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती त्वरित कारवाई करून त्या तळ्याच्या खोलीकरण करण्यासाठी बाहेर काढलेली वाळू वाळू माफिया सायजीराजे पार्क मधून खरेदी करून बाहेर विकताना दिसत असून माळशिरस तालुक्यातील एकही गावामध्ये वाळूचा ठेका नसताना सायजीराजे पार्कमधील तळ्यातील वाळू उपसा करण्याची परवानगी सायजीराजे पार्क च्या मालकाला कुणी दिली?असा प्रश्न उपस्थित झाला आहे,तसेच सायजीराजे पार्क शेजारीही वाळू उपसा चालू असून ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वाळू उपसा केला जातोय त्याच्यावर कारवाई करून सायजीराजे राजे पार्कच्या मालकलाही आजपर्यंत बेकायदेशीर वाळू उपसा केल्याप्रकरणी दंड आकारून कारवाई करावी तसेच ही बेकायदेशीर वाळू वाहतूक केलेली निष्पन्न करण्यासाठी गेल्या दोन महिन्यातील आनंदनगर ते अकलूज व आनंदनगर ते चाकोरे या रस्त्यावरील ज्यांच्या घरी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यांचे फुटेज तपासल्यानंतर ह्या बेकायदेशीर वाळू वाहतूक केलेल्या वाहनांची पोलखोल होणार आहे आणि या संबंधी तात्काळ कारवाई न केल्यास तहसील कार्यालयासमोर दिनांक २४ /९/२०२० रोजी तीव्र स्वरूपात ठिय्या व थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा बापू वाघमारे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom