माळशिरस तालुका कोरोनाच्या पोझिटीव्ह संख्येने हादरला
प्रतिनिधी—अकलूज
आज सायंकाळी 6.30 पर्यंतच्या परिस्थितीप्रमाणे माळशिरस तालुक्यातील विविध गावामध्ये ४४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने माळशिरस तालुका हादरला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाची गावाप्रमाणे वर्गवारी अकलूज येथे 20, माळेवाडी 1, वेळापूर 3, सदाशिवनगर 8,माळीनगर 10, नातेपुते 1, शिंदेवाडी 1 अशाप्रकारे तालुक्यात एकूण 44 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. अशा प्रकारे तालुक्यात आतापर्यंत 76 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत .आज 3 रुग्णांना को़विड केअर सेंटर महाळुंग इथून घरी पाठविण्यात आलेले आहेत अशी माहिती माळशिरस तालुक्याचे आरोग्यधिकारी डॉ मोहिते यांनी माहिती दिली.
आपल्या तालुक्यात तसेच बाहेर पॉझिटिव आलेल्या व्यक्तींच्या मोठा संपर्क आढळून येत आहे. अजूनही 41 अहवाल अप्राप्त आहेत. आत्ताची परिस्थिती पाहता तालुक्याच्या सर्व भागातून रुग्ण मोठा प्रमाणात निघत आहेत किंवा त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत. त्यामुळे आपण वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होऊ शकते .बाहेरून आलेल्या व्यक्तींना तसेच बाहेर एक दिवस ही जाऊन आलेल्या व्यक्तीना अलगीकरणामध्ये ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे .सध्या कोरोना रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स, गर्दी टाळणे ,स्वच्छतेचे नियम, हाताची स्वच्छता, मास्क वापरणे या गोष्टी पाळणे फार महत्त्वाचे आहे असे आवाहन डॉ मोहिते यांनी माळशिरस तालुक्यातील जनतेला केले आहे.
