माळशिरस तालुक्यातील विरोधकांचे मुख्यालय हे वेळापूर येथील गरुड बंगलाच आहे अशी मोहिते पाटील विरोधकामध्ये जोरदार चर्चा
प्रतिनिधी—अकलूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काल सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सर्वप्रथम त्यांनी कण्हेर ता.माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले रमेश पाटील यांच्या वडीलांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि सोलापूर कडे जाण्यासाठी रवाना झाले मात्र माळशिरस येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी थांबले होते त्यांच्या विनंतीला मान देऊन शरद पवार त्यांच्या घरी गेले त्याच बरोबर शरद पवार हे माळशिरस तालुक्यातील प्रमुख विरोधक असलेले उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यावर दाखल झाले,व धान्य बँकेत उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त गोळा झालेल्या जीवनावश्यक वस्तूचे लोकार्पण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.त्याचवेळी शरद पवार यांच्यावर उत्तमराव जानकर यांनी स्वतः लिहिलेल्या पोवाड्याचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले,हा पोवाडा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे व सोलापूर चे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी उत्तराव जानकर यांचे तोंडभरून कौतुक केले.
काही भाजप धार्जिन लोकांना खूप आनंद झाला आहे की,शरद पावर यांनी अगोदर उत्तमराव जानकर यांच्याकडे जायला हवे होते,परंतु ते माळशिरस येथील कार्यकर्ते यांच्याकडे थांबले आणि नंतर उत्तम जानकर यांच्याकडे गेले मात्र कण्हेर येथून येताना पहिल्यांदा माळशिरस लागते हे भाजप धार्जिन लोक विसरली आणि वेळापूरमध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जास्त गर्दी करू नये आशा सूचना प्रशासनाने दिलेल्या होत्या.त्यामुळे भाजप धार्जिन लोकांनी जास्त हस्यकल्लोळ करू नये त्यांना उत्तमराव जानकर यांच्या बाबतीत जे घडायला पाहिजे असं वाटतं ते कधीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडणार नाही.
माळशिरस तालुक्यातील विरोधकांचे मुख्यालय म्हणजे वेळापूर येथील उत्तमराव जानकर यांचा गरुड बंगलाच आहे,असे मोहिते पाटील विरोधकामध्ये जोरदार चर्चा आहे.
माळशिरस तालुक्यात विधानसभा निवडणुकीत कोणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी प्रयत्न केले याचा संपूर्ण इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवडणूक झाल्यानंतरच पोच झाला असल्याने उत्तमराव जानकर यांचा बुरुज ढासळल आशा भोळ्या बाबड्या आशेमध्ये भाजप धार्जिन लोकांनी राहू नये.
