संत नामदेव महाराज यांच्या वंशजांवर गुन्हा मागे घेण्यात यावा– अवधुत गडकरी.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कडून
प्रांताधिकारी यांना निवेदन
संत नामदेव महाराज यांच्या वंशजांवर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावा. व ते नामदेव महाराजांचे सतरावे वंशज आहेत. हिंदु धर्मातील व वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित गुन्हा दाखल केला तो त्वरित मागे घेण्यात यावा.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विठ्ठलाची काढलेली पालखी त्यामध्ये २० ते २२ लोक होते व अधिकारी आणि कर्मचारी लोक उपस्थित होते, त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करावा.विठ्ठलाची प्रक्षाळ पुजा फक्त पुजारीनी देवाला स्नान घालावे अशी प्रथा होती.त्या पुजेमध्ये संख्येपेक्षा जास्त पुजारी व अधिकारी उपस्थित होते.त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात यावा. यावेळी जिल्हा संघटक सागर बडवे शहराध्यक्ष प्रताप भोसले शहर उपाध्यक्ष अवधूत गडकरी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
