
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल,महाराष्ट्र प्रदेश यांचेकडून
फेस मस्क सील्ड वाटप
माळशिरस प्रतिनिधी सचिन रणदिवे
सोलापूर जिल्ह्यासाठी कोरोना विषाणू निर्मित महामारीच्या विरुद्ध लढण्यासाठी जिल्हाभर राबत असलेल्या डॉक्टर्स, नर्स तसेच अनेकर्मचारी यांचे साठी फेस मास्क सिल्ड पाठवण्यात आले ते आज माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी यांच्या मार्फत नातेपुते, मांडवे,फोंडशिरस, मोरोची येथील ग्रामीण रूग्णालयात सुपूर्द करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळशिरस तालुक्याचे युवा नेते पै.अक्षय भांड,तालुका कार्यअध्यक्ष राजकुमार हिवरकर,तालुका संघंटक दादा मुलाणी,रियाज शेख,व लखन चांगण ,हे पदाधिकारी उपस्थित होते.