
पोलीस कर्मचारी व रेशनदुकानदार यांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने सॅनिटायजर वाटप
प्रतिनिधी–अकलूज—अकलूजमधील बंदोबस्तास असलेले पोलीस कर्मचारी,संग्रामनगर,माळेवाडी, अकलूज येथील रेशनदुकानचालक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सॅनिटायजर वाटप केले.

सद्या कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माळशिरस तालुक्यामध्ये कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.या संचारबंदी व लॉकडाउन च्या काळामध्ये जनतेने शासनाच्या सूचनांचे योग्य पालन करावे जनतेने घराच्या बाहेर विनाकारण पडू नये यासाठी बंदोबस्तास असलेले व आपली जबाबदारी पार पाडणारे पोलीस कर्मचारी यांना व कडक संचारबंदी व लॉकडाउन चा कालावधी असताना सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचे रेशन उपलब्ध करून देण्यासाठी आपली सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकाने उघडी ठेऊन आपली जबाबदारी पार पाडणारे अकलूज,माळेवाडी,संग्रामनगर, येथील रेशनदुकान चालक यांना ही राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडच्या वतीने किरण साठे यांच्या हस्ते सॅनिटायजर वाटप करण्यात आले.यावेळी आनंद मिसाळ,सोमनाथ शेळके,उदय कांबळे सुजित साठे इत्यादी उपस्थित होते.
