
टेंभुर्णी येथील मंडलाधिकारी मनिषा लकडे यांच्या गैरप्रकाराबद्दल किरण साठे यांची महसूलमंत्री यांच्याकडे तक्रार
टेभुर्णी ता.माढा येथील तुळजाभवानी आश्रम शाळेतील गैरप्रकाराची चौकशी करून संबंधित मंडलाधिकारी सौ.मनिषा लकडे ह्या दोषी आढळल्यास त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली असल्याचे सांगितले.
देशासह राज्यामध्ये लोक डाउन व संचारबंदी असल्याने सोलापूर जिल्ह्यात त्याचे काटेकोरपणे पालन होत असताना सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनी दिनांक १३/४/२०२०रोजी आदेश काढून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी नसल्याचे जाहीर केले होते,मात्र त्यांच्याच महसूल विभागाच्या टेंभुर्णी गावच्या मंडलाधिकारी सौ.मनिषा लकडे यांनी आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक १४/४/२०२० रोजी टेंभुर्णी येथील तुळजाभवानी आश्रम शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून स्वतः त्या कार्यक्रमाला हजर राहून जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे,असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनात म्हटले आहे.
सदर तुळजाभवानी आश्रम शाळेत परप्रांतीय लोकांच्या राहण्याची सोय प्रशासनाने केलेली आहे,ह्याच लोकांबरोबर मंडलाधिकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला आहे,या कार्यक्रमात कुठेही सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन झालेले दिसून येत नाही.
परप्रांतीय लोकांना तुळजाभवानी आश्रम शाळेत राहण्याची व्यवस्था केली असल्याने संबंधित गावातील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था या लोकांच्या खाण्याची व्यवस्था करावी या दुरुष्टीकोनाने सामाजिक कार्य म्हणून कोण अन्न,धान्य,तर कोण फळे वाटप करीत असतात,मात्र त्या लोकांना दिलेल्या फळांवर दरोडा टाकण्याचे काम संबंधित मंडलाधिकारी सौ.मनीषा लकडे यांनी केले आहे,तसेच या आश्रमातील अजून कोणत्या वस्तू वरती त्यांनी दरोडा टाकला आहे त्याची चौकशी करावी, सदर निवेदनात नमूद केलेल्या विषययाचे पुरावे किरण साठे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवले आहेत,
टेभुर्णी येथील तुळजाभवानी आश्रम शाळेतील दिनांक१४/४/२०२० व दिनांक १५/४/२०२० रोजीचे CCTV फुटेज तपासून दोशी आढळणाऱ्या व सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाला झुगारून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मंडलाधिकारी सौ.मनीषा लकडे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे,व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये कारवाई करून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे.