
अवैध दारु विक्रीत्यास सहकार्य करणाऱ्या पोलिस अधिकारी यांच्या वर कारवाई करा-भारतीय दलित महासंघ.
अवैध दारु विक्री करणार्या व त्यांना सहकार्य करणार्या वरीष्ठ तसेच संमधित पोलिस अधिकारी यांची चौकशी करुण गुन्हे दाखल करा अशि मागणी, भारतीय दलित महासंघाच्या वतीने पोलिस महासंचालक यांच्या कडे केली……!
देश , कोरोनाच्या विळख्यात अस्ताना सोलापूर जिल्हामधील मोहळ तसेच माळशिरस तालुक्यामध्ये अवैध दारु विक्री राजरोज पणे सुरु आसल्याने , सर्वसामान्य लोकांची दखल पोलीस स्टेशन घेत नाहीत. दारु विक्री करणारे गुंडप्रवृत्तीचे आसल्याने तक्रार देण्यास स्थानिकचे लोक घाबरत आहेत .त्यामूळे लोक संघटने मार्फत तक्रार देण्याच्या ईराध्याने फोन करत आहेत. वरीष्ठ अधीकार्यांना
फोन केल्यानंतर वरीष्ठ अधीकारी पुन्हा संमधीत पोलीस स्टेशनला फोन करत आहेत. आणी संमधीत पोलीस अधीकारी हे गोपनिय माहीती देणार्याचे नाव, अवैध दारु विक्री करणार्या ईसमाला सांगत आहेत आणी कार्यकर्त्याचे आणी दारु विक्री करणार्याचे भांडण! लाऊण्याच काम करत आहेत.अवैध दारु विक्री करणार्याचे आणी वरीष्ठ पोलीस अधीकार्याचे हीतसंमंध आसल्यामुळे या विषयावर ठोस कारवाई होत नसल्याचे खवणी ता.मोहळ प्रकरणावरुण दिसुन आले आहे.फोनवरुण धमकी देणारा माने हा सराईत गुन्हेगार आसुन तो संघटणेच्या संस्थापक , कार्यकर्त्यानां राजरोसपणे धमकी देतोय आणी पोलीस बघ्याची भुमीका घेत आहेत.यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांची मणे दुखावली गेली आहेत याच्या पाठीमागे फारमोठे कटुकारस्थान , खुनाचे शडयंत्र आसु शकते. अशा गुंडाचे आणी पोलीस अधीकार्याची खातेनिहाय कसुन चौकशी करुण, गुन्हे दाखल करुन, बडतर्फ करा.अन्यथा लाॅकडाऊंण संपल्यावर आंदोलन करणार आसल्याचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब लोखंडे म्हणाले.