किरण साठे यांच्या झाडलोट कर्मचारी यांच्या पगारी बद्दलच्या मागणीला परिवहन मंत्री अनिल परब यांचा सकारात्मक प्रतिसाद

किरण साठे यांच्या झाडलोट कर्मचारी यांच्या पगारी बद्दलच्या मागणीला परिवहन मंत्री अनिल परब यांचा सकारात्मक प्रतिसाद

सोलापूर जिल्ह्यातील एसटी स्टँड मध्ये झाडलोट करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची सोय करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व संसदीय कार्य मंत्री श्री अनिल परब यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.सदर निवेदन हे परिवहन मंत्रालयाचे ओ एस डी श्री मनोज कुलकर्णी यांच्या व्हाट्सएपवरून पाठवण्यात आले आहे,तसेच निवेदन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्यामार्फत ही पाठवण्यात आले आहे.

सद्या कोरोनाने देशासह राज्यामध्ये थैमान घातले असून त्याच पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉक डाउन असल्याने सर्वसामान्य जनतेला घरामध्ये बसावे लागत असून त्यांच्या हाताला काम नसल्याने सर्वसामान्य जनता हतबल झाली असताना सोलापूर जिल्ह्यात आपल्या परिवहन खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या एसटी स्टँड च्या परिसरात झाडलोट करणाऱ्या कर्मचारी यांना कामाला ठेवण्यासाठी खाजगी कंपनीच्या माध्यमातून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे असे निवेदनात म्हटले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सदर कर्मचारी हे अतिशय गरीब घरातील असून या कर्मचारी यांचे गेली सहा महिने पगार न झाल्याने व त्यांचे हातावरचे पोट असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,संबंधित ठेका घेतलेल्या कंपनीकडे पाठपुरावा केल्यास ते राज्य सरकारने आम्हाला अजून पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही आपली पगार करू शकत नाही असे उत्तर देत आहेत,व राज्य सरकार कडे बोट दाखवीत आहेत.त्यामुळे या सर्व कर्मचारी यांचे बेहाल झाले असून आपण त्वरित या कर्मचारी यांचे पगार करण्याची आपल्या खात्यामार्फत योग्य ती उपाययोजना करून त्या खाजगी कंपनीकडून सोय करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस यांनी परिवहन मंत्री व संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.

एसटी स्टँड मध्ये कामाला असणाऱ्या कर्मचारी यांच्या पगार मिळण्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन किरण साठे यांच्या मागणीला अनुसरून संबंधित ठेकेदार यांची बिले तपासून योग्य बिले असतील तर बिले देण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगितले व संबंधित ठेकेदार व एजन्सीधारक याने स्वतः बिले देने बंधनकारक असल्याचेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom