होलसेल किराणा दुकानदार यांच्या मुसक्या प्रशासनाला सोबत घेऊन आवळण्यात येणार माहिती सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य

होलसेल किराणा दुकानदार यांच्या मुसक्या प्रशासनाला सोबत घेऊन आवळण्यात येणार माहिती सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य

संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईचा फटका जनसामान्य लोकांना दररोज बसत असून या राष्ट्रीय आपत्ती मध्ये होणारी पिळवणूक शासकीय अधिकारी व मा जिल्हाधिकारी यांनी त्वरित थांबवावी अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे माळशिरस तालुक्यामधील सर्वच गावामध्ये किराणा दुकानदार व ग्राहकांमध्ये यावरून अनेक ठिकाणी वितंडवाद होत असून प्रत्येक वस्तू पाठीमागे वीस ते पंचवीस रुपयांची वाढ झालेली असून दुकानदाराने त्यांना मिळालेल्या मालाची बिले दाखवल्यानंतर या कालावधीत नेमलेले पुरवठादार हेच वाढिव दराने किराणा माल विकत असल्याचे दिसून येत आहे ,गरजेपुरते लागणार जीवनावश्यक साहित्य याचे दर जर गगनाला भिडले तर सामान्य माणसास जीवन जगणे कठीण झालं आहे शेंगदाणा, तेल,साखर,आदी आवश्यक वस्तूंचे दर भलतेच वाढले आहेत एक किलो शेंगदाणे या वरती सुमारे पंचवीस रुपयांची वाढ झाली असून तेलाचे दर तर भलतेच वाढलेले आहेत, अजून जर हा बंदीचा कालावधी वाढला गेला तर गोरगरीब,मजूर व शेतकरी वर्गास दोन वेळचे जेवण मिळणं हे सुद्धा कठीण होऊन बसेल ,रोजगार नाही,बाजारातील पत संपली असून येणारा दररोजचा दिवस एक संकट म्हणून घालवला जात आहे , राष्ट्रीय आपत्तीचा गैर वापर करून सामान्य लोकांची लुबाडणूक करणाऱ्या होलसेल किराणा दुकानदारांच्या प्रशासनाने वेळीच मुसक्या आवळनयात याव्यात यासाठी माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी सोलापूर व शासन,प्रशासनास मागणी करण्यात येत आहे. जर कोणी दमदाटी चा वापर करून होलसेल किराणा दुकानदार किराणामाल विकणार असेल त्यांना माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की सर्व सामान्य लोकांची पिळवणूक वेळेस थांबवा अन्यथा प्रशासनाच्या वतीने व माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने आपणावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. जर एखादा दुकानदार अडवणूक करत असेल तर त्यासाठी मो नं 9730093611 या नंबर वरती संपर्क साधा वेळीच प्रशासनाला बरोबर घेऊन होलसेल किराणा दुकानदार असेल रिटेल किराणा दुकानदार असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे बोलताना सचिन रणदिवे माहिती सेवा भावी संस्था सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle