संजय गांधी कॉम्प्युटर साक्षरता मिशन अंतर्गत कौशल्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर वेळापूर तर्फे वर्क फ्रॉम होम बेसिस वर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

संजय गांधी कॉम्प्युटर साक्षरता मिशन अंतर्गत कौशल्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर वेळापूर तर्फे वर्क फ्रॉम होम बेसिस वर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी-सचिन रणदिवे

संजय गांधी कॉम्प्युटर साक्षरता मिशन अंतर्गत असणाऱ्या कौशल्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर वेळापूर तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा विद्यार्थ्यांना आपल्या घरातूनच म्हणजेच वर्क फ्रॉम होम घेण्यात आल्या होत्या यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या जगभरामध्ये कोरोना या विषाणूने थैमान घातल्यामुळे अनेक शालेय परीक्षा तातडीने रद्द करून विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना मिळालेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या सुट्टीचा उपयोग चित्रकला स्पर्धेतून आपला छंद जोपासता यावा आणि निबंध स्पर्धेमधून आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी या हेतूने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी वेळापूर व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा सर्वांच्या आवडीची ठरली आणि अनेकांनी यामध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे या स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थ्यां सोबतच सुशिक्षित वर्गाचाही एक वेगळा गट तयार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेमध्ये दोन गट करण्यात आले. चित्रकला स्पर्धेमध्ये महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर या विद्यालयातील मंदार मकरंद कुलकर्णी आणि लोकविकास मराठी मिडीयम स्कूल वेळापूर या विद्यालयातील आदिती महेश स्वामी या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला, द्वितीय क्रमांक सदाशिवराव माने विद्यालय अकलूज या विद्यालयातील समर्थ किशोर वेदपाठक आणि सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विद्यालय वेळापूर या विद्यालयातील ऋतुजा तुकाराम अनंतकवळस या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तृतीय क्रमांक इंग्लिश स्कूल वेळापूर या विद्यालयातील विश्वतेज चंद्रकांत राऊत आणि इंग्लिश स्कूल वेळापूर या विद्यालयातील यश हरी राऊत या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तर निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक लोकविकास मराठी मिडीयम स्कूल वेळापूर या विद्यालयातील आदित्य सुभाष चौगुले आणि इंग्लिश स्कूल वेळापूर या विद्यालयातील ओंकार हरी राऊत या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला, द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडूस या विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी मृणाल मकरंद कुलकर्णी आणि जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सराटी या विद्यालयातील स्नेहल अरुण खंडागळे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तृतीय क्रमांक गुरुकुल विद्यालय आटपाडी या विद्यालयातील अभिजीत तानाजी माने आणि जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा खडूस मधील सुजित तानाजी माने या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसोबत सुशिक्षित व नोकरदार वर्गानेही बहुसंख्येने सहभाग नोंदविला या सुशिक्षित वर्गामध्ये प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ. सीमा वैभव पिसे यांनी निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला तर डॉक्टर सचेतन नानासाहेब घोडके यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रत्येकाला अनंत काळापासून आपल्या आवडीची तसेच वेळेअभावी रखडली गेलेली कला पुन्हा संजय गांधी कॉम्प्युटर साक्षरता मिशन अंतर्गत असणारे कौशल्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये आपली कला जोपासता आली. सुशिक्षित व नोकरदार वर्गाच्या गटामध्ये बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला यामध्ये गृहिणी, व्यवसायिक, शिक्षिक, डॉक्टर, अंगणवाडी सेविका इत्यादींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमुळे अनेकांना आपला छंद जोपासता आला, घेण्यात आलेल्या या स्पर्धांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle