अकलूज व आसपासच्या गरजु,गोरगरीब व निराधारांना आजपासून किरण साठे मोफत घरपोच जेवण देणार–उदय कांबळे

अकलूज व आसपासच्या गरजु,गोरगरीब व निराधारांना आजपासून किरण साठे मोफत घरपोच जेवण देणार–उदय कांबळे

प्रतिनिधी—लवंग

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी अकलूजमधील व अकलूजच्या आसपासच्या गरजू,गोरगरीब, निराधारांना मोफत घरपोच जेवण देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला असल्याचे बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करून जोपर्यंत लॉक डाउन व संचारबंदी चा कालावधी आहे तोपर्यंत ज्या गोरगरीब,गरजू व निराधारांना रेशन दुकानावर माल उपलब्ध होणार नाही अशा सर्व लोकांच्यासाठी व आवश्यकता असणाऱ्या व खरोखरच गरज असलेल्या जनतेसाठी हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी हाती घेतला असून हा कार्यक्रम दिनांक ८ एप्रिल पासून म्हणजे आजपासून सुरू करण्यात येणार असल्याचे उदय कांबळे यांनी सांगितले.

अकलूजमधील व अकलूजच्या आसपास राहणाऱ्या(माळेवाडी,माळीनगर,संग्रामनगर,यशवंतनगर)येथील जनतेने आवश्यकता वाटल्यास 8390459999,9673664444 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depomtaraftarium24taraftarium24 girişcanlı maç izle