
प्रहार संघटनेचे अविनाश सोनवणे यांच्याकडून राऊत नगर,आंबेडकर नगर येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप
प्रतिनिधी–अकलूज
राऊतनगर आणि आंबेडकरनगर मध्ये जीवनावश्यक वस्तूचे प्रहार विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाश सोनवणे यांनी वाटप केले.सध्या कोरोना या रोगाने संपूर्ण जगावर संकट उभे असताना अकलूज परिसरातील राऊतनगर, आंबेडकरनगर या ठिकाणी काही हातावर पोट असलेली घर संचार बंदी मुळे काही काम धंदा करू शकत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. हे पाहून मी माझ्या मित्रपरीवाराला सोबत घेऊन त्या परिसरात जीवनावश्यक अन्नधान्य वस्तूचं वाटप असल्याचे अविनाश सोनवणे यांनी सांगितले. त्यामध्ये घरगुती सामानाच्या किटमध्ये तांदूळू-2, गहु-2, साखर-1किलो, शेंगदाणे-1किलो, तेल-1किलो, तूर-1किलो, तूर-अर्धा किलो, चहापत्ती-पावशेर या वस्तूंचा घरगुती सामानाच्या किटमध्ये समावेश होता.आणि आम्ही अशा वस्तूंचे वाटप केले.असून सदरचे वाटप करताना युवासेना शहर प्रमुख शेखर भैय्या खिलारे, संदीप इंगवले,कानिफ कदम,आकाश भोसले, ज्ञानेश्वर भोसले,आकाश रोडगे, अक्षय वाईकर,अक्षय भोसले, औदुंबर बागल,अविनाश जगदाळे,सनी अंबुरे,महेश बबलादी,प्रकाश बनकर,स्वराज भोसले या सर्व सहकारी मित्रांनी घरोघरी जाऊन हे धान्य गरजूवंतांना अशा उपासमारीच्या आणि महामारीच्याच्या संकट काळात पोहचवण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले. विशेषतः ज्या लोकांनी,मित्रांनी मला मदत केली आशा सर्वांचा मी ॠणी आहे.असंच आपल्या सर्वांच पाठबळ मिळून आपल्या हातून समाजकार्य घडो.. करोना विरुद्ध लढत असताना सर्वांनी काळजी घ्या आपण सर्वजण माझ्यासाठी मौल्यवान आहात..असे जनतेला अविनाश सोनवणे यांनी आवाहन केले.