
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तम जानकर व बाळासाहेब धाईंजे यांच्या नेतृत्वाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
प्रतिनिधी:- सचिन रणदिवे
कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लॉक डाऊन असल्या कारणाने सर्वसामान्य लोकांना हाताला काम धंदा नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर साहेब व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा सरचिटणीस पिनू भाऊ येडगे यांनी युपी-बिहार परराज्यातून आलेल्या लोकांना व स्थानिक लोकांना गहू, तांदूळ, साखर, तेल, चहा पावडर, मुगडाळ देऊन मदतीचा हात पुढे केला. तसेच त्यांना कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घराबाहेर पडू नका काळजी घ्या अशी विनंती करण्यात आली. यावेळी आरपीआय नेते रजनीश बनसोडे सचिन सर्वगोड अण्णा शिंदे नारायण सर्वगोड अवि अवघडे दादा गालफाडे उपस्थित होते.