
रेणुका परिवाराच्यावतीने नातेपुते येथे 1500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नातेपुते –प्रतिनिधी–सचिन रणदिवे
येथील रेणुका परिवाराच्या वतीने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच रेणुका परिवाराचे सर्वासर्वे मा.श्री बाबाराजे देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण नातेपुते शहरा मध्ये गरजू कुटुंबियांना गृह उपयोगी साहित्यांचे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नातेपुते येथील समाजभुषण नगर येथून माजी जि प उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. गावाला कुटुंब मानून गावांमध्ये असणाऱ्या गरजू गोरगरीब कुटुंबाला धान्य तांदूळ तसेच त्याच्यासोबत लागणारे अन्न वस्तूंचे पॅकेज करून शहरांमध्ये वार्ड नुसार घरपोच देण्याचे नियोजन रेणुका परिवाराच्या वतीने करण्यात आले संपूर्ण शहरांमध्ये राबवण्यात येत असलेल्या घरपोच सेवा या उपक्रमामुळे विविध सामाजिक संघटना तरुणवर्ग या सर्वांना प्रेरणा मिळून भरपूर मदतीचे हात पुढे येऊन मानवा कडूनच मानवतेची दर्शन घडावे यासाठी रेणुका परिवार सतत अग्रेसर आहे आज देशावर पूर्ण संकट आलेले आहे ते घालवण्यासाठी सरकारने घरातच सुरक्षित राहण्याचे आव्हान केले आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच रहावे आरोग्याच्या दृष्टीने लागणारे मास्क, निर्जंतुकीकरणासाठी लागणारे साहित्य वाटप करण्यासाठी गावातील प्रत्येक वार्ड नुसार रेणुका परिवाराचे सदस्य कामकाज पाहत आहेत असे बाबाराजे देशमुख यांनी सांगितले गरजू गरिबांना घरोघरी जाऊन मदतीचा हात देण्यासाठी विविध वॉर्डमध्ये अमरसिंह देशमुख,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती मामासाहेब पांढरे,महेश शेटे,उत्तम बरडकर, अतुल बावकर, मालोजीराजे देशमुख, धनाजी देशमुख, रणविरसिंह देशमुख,दादासाहेब लांळगे, राहुल पद्मन, धनाजी पांढरे, अजित बाविस्कर, महावीर साळवे, नवाज सोरटे, शशी कल्यानी, समीर सोरटे, सागर बीचुकले, रोहित शेटे, शक्ती पलंगे, प्रवीण राऊत, प्रेम देवकाते, बाळासाहेब पांढरे, सागर बिचुकले, बाळासाहेब ठोंबरे,अतुल बावकर, राहुल पद्मन,महावीर साळवे, केरबा लांडगे, तसेच मामासाहेब पांढरे मित्र मंडळ व अधिक कार्यकर्ते गरजू लोकांना घरपोच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.