आशा स्वयंसेविकांचे मानधनात वाढ करीत त्यांना सेवेमध्ये सामावून घेण्याची मागणी

आशा स्वयंसेविकांचे मानधनात वाढ करीत त्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी

माळशिरस

आजच्या घडीला संबंध देश कोरोनोनी होरपळा जात आहे आरोग्य विभागातील थोड्या मानधनावर काम करून सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाऊन काम करणाऱ्या आशा सेविकांना राज्यशासनाने त्यांच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांचेकडे केली आहे तालुक्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब धाइंजे यांनी निवेदन पाठविले आहे आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या कमी मानधन असूनही लोकांपर्यंत जाऊन आरोग्यसेवा देणे, शासनाच्या योजनांची माहिती पुरवणे आणि आरोग्य विषयक जनजागृती करणे यासाठी आशा स्वयंसेविका हा महत्त्वाचा घटक असून या आशा स्वयंसेविका कामावर आधारित अगदी अल्प मोबदला घेऊन सेवा देत असतात. सध्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन परिस्थितीची माहिती घेत आहेत आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत तरी संकटसमयी आरोग्यसेवा देणाऱ्या या आशांच्या मानधनात वाढ करावी तसेच त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले तर आरोग्य सेवा ग्रामीण भागातील चांगली होईल तसेच आरोग्यसेविकाना मदतही होईल तरी याचा विचार करून राज्य सरकारने आशांचा सहानुभूतीने विचार करावा अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य अजय सकट , बाळासाहेब धाइंजे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom