
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या वतीने गरजू,गरीब व निराधारना धान्य व साखर वाटप
प्रतिनिधी–अकलूज
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी यशवंतनगर मधील शिवतेजनगर,माळेवाडी येथील विद्यानगर,माळीनगर येथील २१ चारी येथील गरजू,गरीब,निराधार व खरोखरच ज्या लोकांना गरज आहे अशांना आज धान्य व साखर वाटप केली.


देशासह महाराष्ट्र राज्यात लॉक डाउन व संचारबंदी असल्याने सर्वसामान्य गरीब,गरजू व निराधार जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून दैनंदिन जीवनातील असलेल्या गरजाही भागवताना त्यांच्या नाकीनव येत असून त्यांना कुठेही कामाला जाता येत नाही.

त्यामुळे त्यांच्या रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे,त्यामुळे ज्या लोकांची खरोखरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,त्यांनाच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते धान्य व साखर वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,कोळी महासंघाचे अध्यक्ष सागर कोळी,बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,अनिल साठे,आनंद मिसाळ,सूरज मोहिते,रहीम तांबोळी इत्यादी उपस्थित होते.

