80 वर्षांच्या योद्धाला वाढदिवसाची भेट देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या मतदारांचे आभार–किरण साठे
प्रतिनिधी—महविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर हे उमेदवार असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन महविकास आघाडीचे जनक व 80 वर्षाचा योद्धा म्हणून ज्यांना महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये ओळखले जाते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या निमित्ताने भेट देण्याची हीच वेळ असल्याचे बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी म्हटले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे,काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात,तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार,यांचे हात बळकट करण्यासाठी महविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन किरण साठे यांनी केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदारांना मतदान करून 80 वर्षाच्या योद्धा ला 80 व्या वाढदिवसानिमत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेट देण्याची हीच वेळ असे भावनिक आवाहन केले होते.त्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद देऊन दोन्ही मतदारसंघातील उमेदवाराना निवडून दिल्याने माझ्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व शिक्षक व पदवीधर मतदार बंधू भगिनी यांचे आभार व्यक्त करीत असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.
