मस्तवाल मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- किरण साठे

मस्तवाल मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- किरण साठे

प्रतिनिधी : माळशिरस :

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देवून मस्तवाल,वाचाळवीर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.निवेदन यु आर देसाई यांनी स्वीकारले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे,युवक शहराध्यक्ष जाकीर शेख,समता परिषदेचे पिंटू एकतपुरे,आनंद मिसाळ,मुकुंद धाइंजे,बापू खरात,रफिक मुलाणी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री म्हणून काम पाहत असलेले अब्दुल सत्तार हे अक्कलशुन्य असल्यासारखे वागत आहेत,आपले सरकार आल्यापासून ते बेछूटपणे काहीही वादग्रस्त वक्तव्य करीत सुटले आहेत,बहुतेक त्यांना स्वतः मंत्रिमंडळात आहेत का नाही हेच माहिती नसावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,महाराष्ट्र राज्यातील जबाबदार मंत्री असं बेजबाबदारपणे वागत असेल तर काय समजायचे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.

अब्दुल सत्तार हे कधी जिल्हाधिकारी यांना दारू प्यायची का ? म्हणून विचारतात तर कधी महिला खासदार असलेल्या सुप्रिया ताई सुळे यांना गलिच्छ भाषा वापरतात हे महाराष्ट्र राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करीत असल्याचे निवेदनात नमूद करून महिलाना गलिच्छ शब्द वापरणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून तात्काळ काढून टाकून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली असून आशा मस्तवाल आणि वाचाळवीर व कोणत्याही प्रकारचे तारतम्य न बाळगता बोलणाऱ्या आशा नालायक मंत्र्याला शिंदे -फडणवीस सरकार पाठिशी घालत असल्याचा प्रचार केला जाईल याची गंभीरपणे दखल घ्यावी असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom