बहुजन ब्रिगेडच्या पाठपुराव्यामुळे विद्यार्थ्यांची व शिक्षकांची वाट झाली सुकर
अकलूजमधील जि.प. शाळेसमोरील धोकादायक खड्ड्याची झाली दुरुस्ती..
प्रतिनिधी : अकलूज : बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा नं 2(21 खोली)समोरील गटारीवरील पुला वरील खड्डा दुरुस्ती करण्यात यावा यासाठी अकलूज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दयानंद गोरे यांना निवेदन देवून बहुजन ब्रिगेडचे युवा आघाडीचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी मागणी केली होती.
जिल्हा परिषद शाळा नं 2(21 खोली)गेट समोरील गटारीवरील पुला वरील मोठ्ठा खड्ड्या पडला आहे.त्या पुला वरुण शाळेतील मुलं,शिक्षक व अंगणवाडीतील लहान मुलं शाळेतून ये-जा करत असतात.त्या मोठ्या खड्ड्या मध्ये पडण्याची भिती निर्माण होत आहे.शाळेच्या गेट समोरील गटारीवरील पुलावरील मोठ्ठा खड्डा पडल्यामुळे त्या शाळेतील मुलांच्या पालकांच्या तक्रारी असून.त्या खड्ड्यांमुळे लहान मुलांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता आहे असे बहुजन ब्रिगेड संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.खड्डा तात्काळ न दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर तो खड्डा दुरुस्ती करण्यात आला असून जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकामधून व शाळेतील शिक्षकांमधून बहुजन ब्रिगेड संघटनेचे कौतुक केलं जातं आहे. खड्डा दुरुस्ती करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आता कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही.तसेच त्यांचा प्रवास सुकर झाला असल्याचे उदय कांबळे यांनी सांगितले.
