29 तारखेला बहुजन ब्रिगेडचा माळशिरस येथे मेळावा

29 तारखेला बहुजन ब्रिगेडचा माळशिरस येथे मेळावा

प्रतिनिधी—माळशिरस—माळशिरस तालुक्यातील बहुजन ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा येत्या 29 सप्टेंबर रोजी माळशिरस येथे मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे माळशिरस तालुकाध्यक्ष विकास बनसोडे यांनी सांगितले.
या मेळाव्याला बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे,प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आप्पासाहेब भोसले,सोलापूर जिल्हा संघटक नानासाहेब खंडाळे,जिल्हाकार्यध्यक्ष सचिन मोरे,जिल्हा सचिव ऋषीपाल बनसोडे,तालुका उपाध्यक्ष अजय साठे,हे उपस्थित राहणार आहेत,
या मेळाव्यामध्ये येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा व संघटनेची भूमिका या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे,तसेच या निवडणुकीत बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने ही निवडणूक लढवायची ठरल्यास संघटनेचा उमेदवार कोण असेल किंवा निवडणूक लढविण्याचे न ठरल्यास पाठिंबा कोणाला द्यायचा याचाही निर्णय होण्याची शक्यता असून या संघटनेच्या भूमिकेकडे व संघटनेचे अध्यक्ष किरण साठे कोणत्या पक्षामध्ये जाण्याची किंवा निवडणूक लढविण्याची घोषणा करतात का याची उत्सुकता माळशिरस तालुक्यातील जनतेला लागून राहिली आहे,या मेळाव्याचे आयोजन माळशिरस तालुकाध्यक्ष विकास बनसोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom