भाजपची सत्ता गेली मात्र त्यांच्या लोकप्रतिनिधी व जबाबदार पदाधिकारी यांची मस्ती गेली नाही—किरण साठे

भाजपची सत्ता गेली मात्र त्यांच्या लोकप्रतिनिधी व जबाबदार पदाधिकारी यांची मस्ती गेली नाही—किरण साठे

प्रतिनिधी—अकलूज—उपविभागीय अधिकारी
माळशिरस विभागअकलूज यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदन देऊन
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,बहुजन ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पिंटू एकतपुरे, कोळी महासंघाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी,रफिक मुलाणी,महावीर पारसे,इत्यादी उपस्थित होते.

माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदार यांच्याबद्दल व महिलांच्या मनाला ठेच पोहचेल असे बेजबाबदारपणे वक्तव्य करून अकलेचे तारे तोडले आहेत.

पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांनाचा सन्मान करणे हे भाजपच्या लोकप्रतिनिधीना कधी जमलेच नाही,एखाद्या महिलांबद्दल असे वक्तव्य करणे ही भाजपची संस्कृती आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे का असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनीम्हटले आहे,एखाद्या महिला अधिकारी यांच्याबद्दल माजी मंत्री असे कसे बोलू शकतात असा प्रश्न निर्माण झाला आहे,ह्या मंत्री महोदयांनी सुद्धा एका महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे याचा विसर या माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना पडलेला दिसून येतोय आहे असेही निवेदनात नमूद केले आहे,भाजपची महाराष्ट्र राज्यातील सत्ता गेली आहे मात्र भाजपच्या लोकप्रतिनिधी व जबाबदार पदाधिकारी यांची मस्ती अजून गेलेली दिसत नाही,असा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी भाजपला लगावला आहे,व हे या वक्तव्यावरून सिद्ध होते आहे.असेही म्हणाले,फुले,शाहू,आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महिलांच्या बद्दल असे वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom