मनविसे च्या आंदोलनाला मिळाले यश–सागर बडवे
प्रतिनिधी–पंढरपूर
आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पद्मावती बागेपर्यत निकृष्ठ कामाची चौकशी करावी.यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. अनिकेत मानोरकर साहेबांनी असे लेखी उत्तर दिले कि येत्या महिन्याभरात चौकशी करून क्राॅट्रेकदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व त्या रोड वरील सर्व खड्डे भरण्यात येतील असे आश्वासन दिले.यावेळी सागर बडवे महाराष्ट्र सैनिक, शैलेश धट महाराष्ट्र सैनिक, अवधुत गडकरी महाराष्ट्र सैनिक, रोहन पंढरपुरकर महाराष्ट्र सैनिक, प्रथमेश धमाळ व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…
पंढरपूर शहरातील व तालुक्यातील प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवून सर्वसामान्य जनतेच्या अडचणीला वाचा फोडण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे,तसेच प्रामुख्याने पंढरपूर शहरातील अनेक समस्या असून त्यावर वेळोवेळी आंदोलने केली आहेत आणि इथून पुढेही आंदोलने करून पंढरपूर शहरातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, शहरामधील कोणत्याहि प्रकारची समस्या असल्यास माझ्याशी संपर्क साधावा
सागर बडवे-माजी जिल्हा संघटक मनविसे, महाराष्ट्र सैनिक
