१०,१२ वी च्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करून ६५ % गुणांची लेखी परीक्षा घेण्याची मागणी

१०,१२ वी च्या विद्यार्थ्यांना सरसकट ३५ % गुण देऊन ६५ % गुणांची लेखी परीक्षा घेण्याची मागणी

किरण साठे यांचे शिक्षण मंत्री यांना निवेदन

प्रतिनिधी : सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फ निवेदन देऊन व ईमेलद्वारे १०,१२ वी च्या विद्यार्थ्यांना ३५% गुण देवून सरसकट पास करून ६५ % गुणांची लेखी परीक्षा घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी केली आहे.सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सौ शमा पवार यांनी स्वीकारले.

शिक्षण विभागामार्फत १०,१२ वी च्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे,त्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संपूर्ण वर्षभर ऑनलाइन अभ्यास घेण्यात आला आणि आता ऑफलाईन परीक्षा कशासाठी असा प्रश्न निश्चितच उपस्थित केला जात आहे,आपल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये द्विदा अवस्था निर्माण झाली आहे.

खरोखरच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास केला आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे,काही विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संकटामुळे मोबाईल घेणे शक्य झाले नाही,तर काहींना मोबाईल असताना रिचार्ज करता आला नसल्याने त्यांना ऑनलाइन अभ्यास करता आला नाही त्यामुळे आपण संपूर्ण गुणांची लेखी परीक्षा घेण्याचे ठरविले असल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये पास होतोय की नाही अशी भीती निर्माण झाली आहे,त्यामुळे आपण नक्कीच ऑफलाईन लेखी परीक्षा घ्या मात्र त्या ६५% मार्कच्या घ्याव्यात आणि १०,१२ वी च्या विद्यार्थ्यांना सरसकट ३५% गुण देऊन पास करावे अशी मागणी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे किरण साठे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत व ईमेलद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom