मोहिते पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पं.स.सदस्य यांचा प्रवेश घडवून आणल्याची जोरदार चर्चा

मोहिते पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पं.स.सदस्य यांचा प्रवेश घडवून आणल्याची जोरदार चर्चा

माळशिरस : प्रतिनिधी : मोहिते पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पंचायत समितीच्या सदस्यांचा प्रवेश घडून आणल्याची जोरदार चर्चा माळशिरस तालुक्यातील जनतेमध्ये होताना दिसून येत आहे.माळशिरस तालुक्यातील ज्या सदस्यांनी मोहिते पाटील यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे,त्यांना गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या माध्यमातून अडवणूक करून संबंधित सदस्यांच्या मतदारसंघाचा जाणूनबुजून विकास होणार याची काळजी घेण्यासाठी त्यांना सतर्क करण्यात आले होते,अशी चर्चा सुरू झाली आहे.ज्या पंचायत समितीच्या सदस्यांनी मोहिते पाटील यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे,त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यानी त्यांच्याबरोबर मोहिते पाटील यांच्या गटामध्ये प्रवेश केला नाही, फक्त पंचायत समितीच्या सदस्यांनी प्रवेश केला आहे,त्यामुळे मोहिते पाटील यांच्या विरोधात या पंचायत समितीच्या सदस्यांना जनतेने निवडून दिले होते,आता या तिन्ही पंचायत समितीच्या सदस्यांचे राजकीय भवितव्य अंधारमय केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या कार्यकर्त्यांमधून व नेत्यामधून बोलले जात आहे.

पंचायत समितीच्या सदस्यांनी उपसभापती निवडीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांच्या गटामध्ये प्रवेश केला त्यांचा प्रवेश घडवून आणण्यासाठी माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांचा सिंहाचा वाटा असून प्रवेश केलेल्या पंचायत समिती सदस्यांच्या प्रत्येक कामाला खोडा घालण्याचे काम गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांनी केले,असल्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.मोहिते पाटील यांच्या गटामध्ये प्रवेश केलेल्या पंचायत समितीच्या सदस्यांना कायदेशीर अडचणी निर्माण करण्यासाठी माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना मोहिते पाटील यांनी सूचना दिल्या होत्या व त्याच पद्धतीने गटविकास अधिकारी वागत होत्या म्हणून गटविकास अधिकारी यांच्या मार्फत मोहिते पाटील यांनी आखलेल्या नियोजनानुसार सर्व कार्यक्रम पार पाडला आहे तसेच मोहिते पाटील यांनी गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन पंचायत समितीच्या सदस्यांचा प्रवेश घडवून आणल्याची जोरदार चर्चा माळशिरस तालुक्यातील जनतेमधून होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom