साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात यावे–इशा गायकवाड
प्रतिनिधी) पंढरपूर
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना इकडून पंढरपूर तहसील कार्यालय निवेदन देण्यात आले
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या मागणीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून शिफारस करणेबाबत
महाराष्ट्रातील साहित्यिकामध्ये साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रगण्य आहे, आपल्या साहित्यातून दलित,श्रमिक,कष्टकरी,शेतकरी,उपेक्षित,आशा अनेक घटकांचे वास्तववादी लिखाण त्यांनी केले असल्याने त्यांचे साहित्य जगातील प्रमुख २७ भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे,त्यामुळे आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे, त्याबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपल्या शाहिरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जागा करून संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीही त्यानी मोठे योगदान दिले आहे.
सन २०२० हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या भारत देशाच्या सुपुत्रास भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या करीता आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस करावी ही विनंती यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे पंढरपूर शहर संघटक शैलेश डॉट पंढरपूर शहराध्यक्ष प्रताप भोसले शहर उपाध्यक्ष अवधूत गडकरी शहर उपाध्यक्ष रोहन पंढरपूरकर विद्यार्थिनी सेनेचे शहराध्यक्ष पूजा माळी शहर उपाध्यक्ष इशा गायकवाड व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
