साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची व त्यांच्या नावे रिसर्च अँड ट्रेनींग इन्स्टिट्यूट (आर्टी) ची स्थापना करण्याची मातंग समाजाची मागणी
प्रतिनिधी—अकलूज
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे व अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने रिसर्च अँड ट्रेनींग इन्स्टीट्युट ( आर्टी ) ची स्थापना करावी या मागणीबाबतचे निवेदन अकलूज शहर मातंग समाजातील युवकांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री व खासदार शरद पवार व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचेकडे पाठवले आहे.यावेळी
किरन साठे,नवनाथ साठे,सुधीर रास्ते ,अनिल साठे,रघुनाथ साठे ,सागर खंडागळे ,बाळासाहेब साठे, मारूती साठे, बाबाजी खंडागळे, अमित भिंगारदिवे विजय खंडागळे, तेजस गायकवाड, सुरज रणदिवे,शहाजी आगाडे,नानासाहेब लोखंडे, शिवाजी साठे इत्यादी उपस्थित होते.
सर निवेदनात म्हटले आहे की सन २०२० हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे या निमित्ताने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे ही गेली अनेक वर्षापासुनची प्रलंबीत असलेली मागणी पूर्ण करावी तसेच अनुसूचित जाती मधील समाजाचा शिक्षण स्तर उंचावण्यासाठी २००८साली बार्टी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे परंतु या ठिकाणी मातंग समाजाला योग्य प्रमाणात न्याय मिळत नाही अशी खंत समाजातील युवका मध्ये झाली आहे या पार्श्वभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड इन्स्टिट्यूट बार्टी चे धर्तीवर आपण आपल्या जाहीरनाम्यात आश्र्वासन दिले प्रमाणे अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनींग इन्स्टीट्युट ( आर्टी ) ची स्थापना करून मातंग समाजातील युवकांना न्याय मिळवून द्यावा असे निवेदन अकलुज शहरातील मातंग समाजातील युवकांनी शरद पावर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल पाठवून व उपविभागीय अधिकारी अकलूज यांचे मार्फत शासनाकडे निवेदन पाठवीले आहे.
