अकलूजमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
प्रतिनिधी—महाराष्ट्र राज्यातील तमाम मातंग समाजाची अस्मिता, प्रतिष्ठा व सर्वस्व असलेले व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या शाहिरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आगीचा वणवा पेटवणारे तसेच थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अकलूजमध्ये असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,जनसेवा संघटनेचे नवनाथ साठे,जनसेवा मागासवर्गीय आघाडी तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे,जनसेवा रिक्षा संघटनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड,समता परिषदेचे पिंटू एकतपुरे,बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष आनंद मिसाळ,मनसेचे सुदाम आवारे इत्यादी उपस्थित होते.
