सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या विरोधातील किरण साठे यांच्या आंदोलनाला यश

सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या विरोधातील किरण साठे यांच्या आंदोलनाला यश

प्रतिनिधी–सोलापूर–सार्वजनिक बांधकाम विभाग
अकलूज या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री ढेपे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देऊन म्हाळुंग ते अकलूज रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारावर व त्याच्या एजन्सीवर कारवाई करावी व संबंधित शाखा अभियंता यांना निलंबित करावे अशी मागणी करून ५ ऑगस्ट रोजीपासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता सदर आंदोलनाची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला तीन ते चार दिवसांत काम करण्याच्या लेखी सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी दिल्या होत्या.

माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग ते अकलूज हा रस्ता नुकताच सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज च्या मार्फत करण्यात आला आहे,हा रस्ता काम केल्यापासून काही महिन्यातच उचकटुन भेगा पडायला सुरुवात झाली आहे.संबंधित रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे सिद्ध होताना दिसत आहे असे किरण साठे यांनी निवेदनात म्हटले होते आहे.रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे,आणि संबंधित काम करीत असताना ठेकेदारानी या कामामध्ये वापरलेले मटेरियल गुणवत्तापूर्वक होते का नाही ?हा प्रश्न उपस्थित होतो आहे,त्यामुळे संबंधित रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आली होती.

त्यामुळे या रस्त्याच्या कामाची दुरूस्ती करून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून घेण्यासाठी आदेश दिले होते त्यानुसार संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केली असल्याने माझ्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom