माळशिरस तालुक्यातील वाढीव बिलासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी—पिलीव— राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माळशिरस तालुक्यातील वीज ग्राहकांना दिलेले वाढीव वीजबिल त्वरित कमी करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी,अकलूज चे कार्यकारी अभियंता श्री अशोक जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन दिले.यावेळी बहुजन ब्रिगेडचे तालुका सरचिटणीस अभयराजे भोसले,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे, आशुतोष साठे इत्यादी उपस्थित होते.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर लॉक डाउन करण्यात आले होते,लॉक डाउन च्या कालावधीत रेग्युलर वीज वापरणाऱ्या व सरासरी पेक्षा जास्त बिल आलेल्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून आपल्या विभागामार्फत सर्वसामान्य वीज ग्राहकाला वाढीव बिल दिले गेल्याने त्या ग्राहकांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे,तसेच संबंधित आपल्या विभागाने सरासरीपेक्षा अंदाजे जास्त वीजबिल आकारले असल्याची शक्यता असून आपण माळशिरस तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांच्या बिलाची तपासणी करून वाढीव देण्यात आलेले बिल दुरुस्ती करून पुन्हा ग्राहकांना वीजबिल पाठविण्यात यावे,असे निवेदनात म्हटले आहे,
तसेच कोणत्याही ग्राहकांनी या वाढीव वीजबिल आल्याने जीवास काही बरेवाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाची राहील याची नोंद घ्यावी आणि तसेच वाढीव बिले दुरुस्ती करून व कमी करून त्वरीत न पाठविल्यास आपल्या कार्यालयासमोर येत्या चार ते पाच दिवसांमध्ये तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदनात दिला आहे.
