सह आयुक्त लोकरे यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर ५ डिसेंबर ला आंदोलन
नातेपुते,माळशिरस येथील मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यासाठी विभागीय स्तरावरून समिती स्थापन करण्याची मागणी
प्रतिनिधी : पुणे : पुणे विभागाचे आयुक्त .डॉ.सौरभ राव यांना बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी तुळजापूर नगरपरिषदेमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप असलेले तत्कालीन मुख्याधिकारी व सद्या सोलापूर नगरपरिषद प्रशासन अधिकारी व सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेले आशिष लोकरे यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली असून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तुळजापूर नागरपरिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना आशिष लोकरे यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप असून त्यांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यलयाच्या संलग्न असलेल्या नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी व सह आयुक्त म्हणून पदभार कसा मिळाला आहे,हा संशोधनाचा विषय आहे, मुख्याधिकारी यांची पोस्ट असताना नगरविकास प्रशासनाचे मुख्य अधिकारी व सह आयुक्त म्हणून त्यांना पदभार देता येतो का ? आणि तो कुणाच्या आशीर्वादामुळे त्यांना पदभार देण्यात आला आहे याची चौकशी करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासन अधिकारी तसेच सह आयुक्त म्हणून काम पाहणारे आशिष लोकरे हे स्वतः कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप असणारे अधिकारी असल्याने त्यांच्या अंतर्गत काम पाहणारे माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी व नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी हे घनकचरा व्यवस्थापनाच्या टेंडर मध्ये खूप मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार करीत असल्याची शक्यता असून संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालून दोन्ही नगरपंचायतचे मुख्याधिकारी शासनाची आर्थिक फसवणूक करीत आहेत आणि संबंधित प्रकरणात मागितलेली माहिती लपवत असून तक्रारदार यांना देत नाहीत तरी आपण या दोन्ही मुख्याधिकारी यांच्या कार्यकाळातील घनकचरा व्यवस्थापन व संपूर्ण कामकाजाची चौकशी करण्यासाठी विभागीय स्तरावरून चौकशी समिती नेमावी,तसेच स्वतः आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेले सह आयुक्त हे संबंधित दोन्ही मुख्याधिकारी यांच्याकडून आर्थिक लाभ घेत असावे अशी शंका आमच्या मनामध्ये उपस्थित झाली आहे,त्यामुळे अशा आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेल्या सह आयुक्त यांना तात्काळ मुख्य पदावरून हकालपट्टी करून शासनाने नेमणूक केलेल्या सह आयुक्त पदावर पात्रता असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ५/१२/२०२२रोजी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.
