प्रांत अधिकारी यांच्या नेमणुकीसाठी आंदोलनाचा इशारा

प्रांत अधिकारी यांच्या नेमणुकीसाठी ५ डिसेंबरला आंदोलनाचा इशारा

विभागीय आयुक्त यांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडचे निवेदन

प्रतिनिधी : लवंग : पुणे विभागाचे आयुक्त डॉ सौरभ राव यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देवून अकलूज येथील प्रांत कार्यालयात कायमस्वरूपी प्रांत अधिकारी यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.

अकलूज येथील प्रांत कार्यालयात एका वर्षात ३ अधिकारी येऊनही कोणीच कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने लोकांची कामे खोळंबली आहेत,त्यांचे नुकसान होत आहे.त्यामुळे या कार्यालयास कायमस्वरुपी अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. या कार्यालयात गेले वर्षी डॉ. विजय देशमुख हे प्रांत अधिकारी होते,ते मेडिकल रजेवर गेल्यानंतर प्रभारी प्रांताधिकारी म्हणून मंगळवेढ्याचे आप्पासाहेब समिंदर यांच्याकडे पदभार दिला गेला.मात्र कायम स्वरुपी नसल्याने त्यांच्याकडे अकलूज व मंगळवेढा असा कार्यभार असल्याने ते लोकांच्या गैरसोयीचे होते.त्यानंतर आता माढा विभागाच्या ज्योती कदम यांच्याकडे पदभार आहे.असे निवेदन किरण साठे नी नमूद केले आहे.

माळशिरस तालुक्यातून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे‌. त्यासाठी या रस्त्यालगतच्या जमिनी भूसंपादित केलेल्या आहेत. त्यात अनेक शेतकरी व सर्व सामान्य जनतेची घरेदारे, विहीर, पाईपलाईन, विंधन विहिरी, फळबागा, असे बाधित झालेले आहेत.त्यांच्या नुकसान भरपाईची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.त्यासाठी ते प्रभारी प्रांताधिकारी यांच्याकडे हेलपाटे घालून बेजार झाले आहेत.
याशिवाय या कार्यालयाशी संबंधीत कुळ कायदा केसेस,सासवड माळी कारखान्याच्या केसेस,बिगरशेती व इतर परवाने अशी अनेक कामे खोळंबली असल्याने लोकांचे नुकसान होत आहे.त्यामुळे या कार्यालयास तातडीने कायमस्वरुपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी,अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ५ डिसेंबर ला तीव्र स्वरूपात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom