सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावरची कारवाई टळली : मिळाली क्लिनचीट!

मविसेच्या आंदोलनाचे झाले फलित : प्रामाणिक अधिकाऱ्यावरची कारवाई टळली याचा आनंद – किरण साठे

प्रतिनिधी: : भारतीय जनता पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून आरोप केले होते आणि सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाई करून व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली होती.त्या मागणीला विरोध म्हणून आणि तुकाराम मुंढे यांच्यावर राजकीय दबावापोटी कारवाई करण्यात येऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्यातून पहिल्यांदा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा पक्षप्रमुख किरण साठे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात दिलेल्या निवेदनात दिला होता.तसेच सोलापूर,पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील तहसीलदार व प्रांत कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आली होती.आणि उर्वरित महाराष्ट्र राज्यातूनही तुकाराम मुंढे यांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळाला होता.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने हाती घेतलेल्या आंदोलनाचे फलित झाले आहे.सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असल्याने त्यांना काही लोकप्रतिनिधीकडून टार्गेट केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी केला होता,दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंढे यांनी राज्यातील बनावट व बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून नोकरी मिळविलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी सुरू केली असल्याने अनेकांची अडचण झाली असून त्यांना टार्गेट करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे किरण साठे यांनी सांगितले.उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे उत्तर दिले आहे.तसेच इओडब्लू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही असा खुलासा मंत्री सामंत यांच्याकडून करण्यात आला.त्यामुळे मुंढे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे आंदोलन आणि निवेदनाचे दबावतंत्र यशस्वी झाले असल्याचे आणि प्रमाणिकपणे जनतेची सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणारी कारवाई टळली याचे समाधान मिळाले असल्याचे साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom