सचिन वावरे यांच्यासाठी वार्ड नंबर २ मधील जनता एकवटली

सचिन वावरे यांच्यासाठी वार्ड नंबर २ मधील जनता एकवटली

प्रतिनिधी : माळशिरस : सचिन आप्पा वावरे म्हटले की लहान मुलांपासून ते जेष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वांना हवेसा वाटणारा माणूस त्यांच्या स्वभावात कधीही उर्मट भाषा,इतरांचे मन दुखावले जाईल अशी कृती कधीही न करणारा माणूस म्हणून त्यानी ओळख निर्माण केली आहे.कोणत्याही प्रकारची राजकिय पार्श्वभूमी नसताना त्यांच्या नसानसात फक्त समाजसेवा करण्याचे विचार भिनले असल्याचे पाहायला मिळत आहेत.

सचिन आप्पा वावरे यांनी माळशिरस नगरपंचायत च्या निवडणूक लढविण्याचा आग्रह त्यांच्याच वार्डमधील जनतेने श्री वावरे यांच्याकडे धरला होता,जनतेच्या आग्रहाखातर त्यांनी वार्ड नंबर २ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले आहे,त्यांच्यावर वार्डमधील सच्चा समाजसेवक म्हणून वार्ड नंबर २ मधील जनतेचा विश्वास आहे,त्यामुळे त्यांच्या वार्डमधील जनतेनेच सचिन आप्पा वावरे यांची निवडणूक हातामध्ये घेतली असल्याचे दिसून येत आहे.

श्री वावरे यांचा निवडणुकीचा फॉर्म भरत असताना वार्डमधील जनतेने दाखवलेली एकी हेच सचिन वावरे यांनी कमावलेली संपत्ती असल्याचे त्यांच्या वार्डमधील जनतेतून बोलले जात आहे,त्यामुळे सचिन वावरे यांच्या सारखा तळमळीने जनतेची काळजी करणारा त्यांची निस्वार्थी सेवा करणारा माणूस नगरसेवक म्हणून मिळाल्यास आमचे भाग्यच उजळेल अशी भावना वार्ड नंबर २ मधील जनतेतून व्यक्त केली जात आहे.त्याचप्रमाणे वार्ड नंबर २ मधील जनतेमध्ये असलेले मतभेद विसरून सचिन वावरे यांच्या निवडणुकीत एकत्र येवून त्यांचे काम जोमाने करताना सर्वसामान्य जनता दिसत आहे.तसेच सचिन वावरे यांना नगरसेवक करण्यासाठी जनता एकवटली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom